इन्स्पायर कोचिंग क्लासेस, धर्माबाद
Inspire Physics Classes • NEET | MHT-CET | Class 9-12

Pathan Sir’s Archive

संकलन आणि विचार: पठाण सर (Pathan Sir)

"जीवनाला दिशा देणारे जगातील मौल्यवान विचार, प्रेरणादायी कोट्स, विचार करायला लावणारे पॉडकास्ट आणि संस्मरणीय संवाद."

← मुख्य पानावर परत जा (Back to Archive)

The Pale Blue Dot: एका छोट्या ठिपक्यावरचे जीवन

१९९० मध्ये व्हॉयेजर-१ या अंतराळयानाने ६ अब्ज किलोमीटर अंतरावरून पृथ्वीचा एक फोटो काढला. त्यात आपली संपूर्ण पृथ्वी सूर्यकिरणांच्या एका कणात तरंगणाऱ्या ‘फिकट निळ्या ठिपक्या’ (Pale Blue Dot) सारखी दिसली.

कार्ल सेगन (Carl Sagan) यांचे या व्हिडिओतील भाष्य आपल्याला नम्र व्हायला शिकवते. आपले अहंकार, क्षुल्लक भांडणे आणि अपयशाचे दु:ख या अथांग विश्वाच्या पसार्‍यात किती नगण्य आहेत!

जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ होईल किंवा अभ्यासाचा ताण येईल, तेव्हा हा व्हिडिओ शांतपणे पाहा — मन शांत होईल आणि जीवनाचा खरा अर्थ उमजेल.